चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

ट्रॅव्हल्समधून अवैध प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त

चंद्रपूर : अवैध प्रतिबंधित तंबाखू व गुटख्याची वाहतूक होत असल्याच्या माहितीच्या आधारावर सावली पोलिसांनी नाकाबंदी करून अवैध प्रतिबंधित तंबाखू व गुटखा गुरुवारी सायंकाळी जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी चालक तरकेश्र्वर साहू (43) रा. भेंडीकला जिल्हा राजनांदगाव छ. ग. 2, वाहक बिर किशोर सूनानी (33) रा. रायपूर छ. ग, तुमेश कुमार साहू (28) रा. सुख्री जिल्हा रायपूर छ. ग. यांच्यावर कलम 188, 272, 273 भादवी सह कलम 59 अन्न सुरक्षा मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी 32 हजार 266 हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू पानमसाला व ट्रॅव्हल्स असा एकूण 15 लाख 32 हजार 266 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  शासनाने सुगंधित तंबाखू गुटखा पानमसाल्यावर बंदी घातली आहे. तरीसुद्धा अनेकजण सुगंधित तंबाखूची तस्करी करून विक्री करत आहेत. ट्रॅव्हल्समधून सुगंधी तंबाखूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती सावली पोलिस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांना मिळाली. त्यांनी आपल्या पथकासह गडचिरोली चंद्रपूर रोडवर नाकाबंदी केली.  रायपूर ते चंद्रपूर जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्रं सीजी 19 एफ 0833 ला थांबवून तपासणी केली. पोलिसांनी सुगंधित तंबाखू व ट्रॅव्हल्स असा एकूण 15 लाख 32 हजार 266 रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.