देश दुनिया

लॉकडाऊनचा फज्जा, गर्दीत १३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (का.प्र.) कोरोना व्हायरस फैलावण्यापासून रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभर लॉकडाऊन घोषित केला. परंतु, या लॉकडाऊनचा फज्जा उडताना दिसतोय. लॉकडाऊननंतर घाबरून हातावर पोट असलेले अनेक गरिब मजूर मोठ्या शहरांतून आपल्या घराकडे निघालेले दिसत आहेत. परंतु, करोना नाही तर रस्त्यांवरची ही गर्दीच त्यांच्यासाठी मृत्यूचे कारण ठरली. आत्तापर्यंत वेगवेगळ्या अपघातांत १३ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. यातील एका व्यक्तीचा मृत्यू जवळपास २०० किलोमीटर पायी चालल्यानंतर अचानक झाला तर १२ जणांचा मृत्यू अपघातात झाल्याचे समोर येते. हैदराबादमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातात ८ प्रवाशांचा मृत्यू झाला.

यामध्ये एका तीन वर्षांच्या चिमुरड्याचाही समावेश आहे. लॉकडाऊन काळात कर्नाटकातून एकूण २३ जण बुलेरो मॅक्स कारमधून लपून-छपून आपल्या घराकडे निघाले होते. या गाडीचा समोरून येणाèया आंब्याने भरलेल्या एका टड्ढकसोबत अपघात झाला आणि त्यातच या प्रवाशांचा अंत झाला. दुसरीकडे मुंबई अहमदाबाद हायवेवर झालेल्या एका अपघातात चार जणांनी आपले प्राण गमावले तर तीन जण जखमी झालेत. हे लोक चालतच आपल्या घराकडे निघालेले असतानारस्त्यातून जाणाèया एका टड्ढकने त्यांना धडक दिली. हा टड्ढक रुग्णालयाला मेडिकल सप्लाय पुरवण्यासाठी निघालेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.