
गडचांदूर (ता.प्र.)-कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नगर परिषदच्या आरोग्य विभागाच्या वतीने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. संपूर्ण शहरात निर्जंतुक करणे मोहीम राबविण्यात आली. औषधे फवारणी करण्यात आली. बाहेर गावातून आलेल्या २२० व्यक्ती होम क्वारेंटाईन आढळून आल्या आहेत. त्यांना योग्य त्या सूचना देऊन घरात राहण्याचा सल्ला दिला.गडचांदूर शहरातील कुणी विद्यार्थी, नागरिक बाहेरगावी अडकलेल्या असतील अशा व्यक्तींनी नगर परिषदशी संपर्क साधावा असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळकी यांनी केले आहेत.


