चंद्रपूर – शहरातील संजय गांधी मार्केट मधील विदर्भ प्रोजेक्ट कार्यालयातील कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली.
जगन्नाथ बाबा नगर येथील पराग मुने वय 44 वर्षे असे मृतक कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पालिकेच्या या संजय गांधी संकुलात विदर्भ प्रोजेक्ट हे बांधकाम कंत्राटदाराचे कार्यालय आहे, पराग मुने हे काल काही कामानिमित्त घरी गेले व लगेच कार्यालयात पोहचले, सकाळपर्यंत मुने घरी न आल्याने परिवारातील सदस्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली पण त्यांचा काही पत्ता लागला नाही.
आज सकाळच्या सुमारास जेव्हा विदर्भ प्रोजेक्ट कार्यालय उघडण्यात आले त्यावेळी वरच्या रूममध्ये पराग मुने हे फासावर लटकलेले आढळले.
विशेष म्हणजे त्यांचा मोबाईल हा सकाळपर्यंत सुरूच होता, रामनगर पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह पुढील तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविलेला आहे, पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.



