चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

शेती आणि शेतकरी हाच विकासाचा केद्रबिंदू – सुधीर मुनगंटीवार……

मूल येथील कृषीमहाविद्यालयाच्या कामाला आता येणार वेग

मुंबई / चंद्रपूर :- शेती आणि शेतकरी हाच राज्याचा विकासाचा केंद्रबिंदू मानून कृषी क्षेत्रात संशोधन आणि नविनतम् प्रयोग करणे हेच आपले ध्येय असायला हवे; त्यादृष्टीने डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या कामाला प्रशासकीय स्तरावर गती देण्यासाठी अधिकाऱ्यांनी गांर्भीयाने लक्ष द्यावे असे आवाहन व तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. येत्या वर्षभरात हे कृषी महाविद्यालय परिपूर्ण व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली

चंद्रपूर विमानतळाचे काम तीन महिन्यात सुरू करा – आमदार सुधीर मुनगंटीवार

◆ वडिलांनी रागावल्याने घर सोडून गेलेल्या मुलाला कुटुंबाच्या सुपूर्द 133 कोटी रुपयांचा मूळ प्रस्ताव असलेल्या कृषी महाविद्यालयाला दिनांक 28/02/2019 रोजी मान्यता मिळाली. या महाविद्यालयाच्या इमारतीत मुला-मुलींचे वसतीगृह तसेच इतर शैक्षणिक सुविधांकरिता आवश्यक बांधकामास मान्यता देण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी कृषी पदवीधर अभ्यासक्रमाची सुविधा निर्माण करणे. बदलत्या हवामानानुसार कृषी व्यवसाय व शेती उद्योग, कृषी तंत्रज्ञान या विषयाच्या प्रसार, प्रचार व्हावा व शेतकऱ्यांनाही फायदा व्हावा या हेतूने सातत्याने पुढाकार घेतला. मूल तालुक्यातील मारोडा/सोमनाथ येथे हे कृषी महाविद्यालय होवू घातले आहे. कृषी महाविद्यालयासाठी पहिल्या टप्प्यात 64.59 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता आजपर्यंत केलेल्या पाठपुराव्यामुळे मिळाली; परंतु निधी उपलब्ध न झाल्याने कामाला गती मिळाली नाही. यापुढे मात्र निधीसाठी काम थांबणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देवून या कामाकरिता 35 कोटीची पुरवणी मागणी करण्यासंदर्भात सूचनाही त्यांनी आज दिल्या. मूळ प्रस्तावासंदर्भातील व्यवस्थित विश्लेषण मांडून हे कृषी महाविद्यालय उत्तम होईल याबाबत प्रेझेटेशन करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. वेतनेतर अनुदानाचे 1 कोटी 80 लक्ष रुपये तातडीने वितरीत करण्याच्या सूचना देखील यावेळी दिल्या. या बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव श्री एकनाथ डवले, वित्त विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, बांधकाम विभाग सचिव प्र. द. नवघरे, कार्यकारी अभियंता श्री भास्करवार, सहसचिव विवेक दहिफळे आदी अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.