राजुरा (ता.प्र) :– राजुरा तालुक्यातील मौजा चिंचोली बुं. येथे दिनांक ७ आॅक्टोबर २०२० ला सकाळी शेतामध्ये कामासाठी गेलेल्या उपसरपंच मारोती नेव्हारे व दादांजी घोडमारे यांच्यावर जगली डुक्कराने हल्ला केला यात हे दोघेही जखमी झाले असून दोघांवरही वैद्यकीय उपचार करण्यात येत आहे. दरम्यान या परिसरात वाघाची दहशत पसरली असून सोमवारी खांबाळा बिटात वाघाने मारोती पेंदाम या शेतकऱ्याचा बळी घेत परिसरातील दहावा मानव बळी घेतला आहे. या वाघाने आतापर्यंत अनेक प्राण्यांचा फडशा पाडला आहे. मागील कित्येक महिन्यांपासून वाघाला जेरबंद करण्यात अयशस्वी ठरत आहे. त्यातच आता जंगली डुक्कराच्या हल्ल्यातून मानव प्राण्यांना संरक्षण देण्याचे आवाहन वनविभागासमोर उभे ठाकले आहे. दरम्यान या नरभक्षक वाघा बरोबरच जंगली डुक्कराचा बंदोबस्त वनविभागाने लवकरात लवकर करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Related Articles
विद्यार्थ्यांना सकारात्मकपणे उचित मार्गदर्शन करून लवकरात लवकर यावर विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ-ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार
लोकनेते विकासपुरुष मा.ना.श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री,महाराष्ट्र राज्य यांच्याकडे इंजि.देवेंद्र वाटकर यांच्या नेतृत्वात असंख्य पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ,मुंबई यांच्या विरोधात मांडली आपली व्यथा. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने २०२१-२२ या सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थ्यांचा अनपेक्षित निकाल लागला. या अनपेक्षित निकालामुळे अनेक विद्यार्थ्यांचे […]
विकासात्मक कार्यात जिल्ह्याचा गौरव वाढविण्याकरिता उद्योजकांनी योगदान द्यावे – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
उद्योजकांनीही सीएसआर अतंर्गत कामांचा सहभाग वाढवावा ना.मुनगंटीवार यांनी घेतला बॉटनिकल गार्डन येथील कामांचा आढावा चंद्रपूर : जिल्ह्यात विविध खनिज संपत्ती व वनसंपत्ती आहे. जिल्हा प्रदूषणाच्या व तापमानाच्या बाबतीत देखील प्रथम क्रमांकावर आहे. या ठिकाणी अनेक उद्योगधंदे/कंपन्या असून येथील कंपन्यांनी जिल्ह्यातील विकासाची नाविन्यपूर्ण कामे पुर्णत्वास नेण्यासाठी सी.एस.आर. निधी उपलब्ध करुन देऊन जिल्ह्याचा गौरव वाढविण्याकरीता योगदान द्यावे, असे […]



