चंद्रपुर

जिल्हयात २४ तासात एकूण ९४ बाधित

चंद्रपुरात कोरोनाने १५ मृत्यू
आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १४४८
चंद्रपूर (का.प्र ): कोरोना वर सर्व पातळीवर आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्नांची पराकाष्टा सुरु असतांनाच आज २४ तासात ९४ कोरोना बाधित सापडले आहेत. आतापर्यंत एकूण १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये १३ जिल्ह्याचे तर एक तेलंगणा व एक बुलढाणा जिल्ह्याचा आहे. सध्यास्थितीत एकूण बाधित १४४८ आहेत. तर आतापर्यंत ९५३ बरे झालेले आहेत. ४८० बाधितांवर उपचार सुरु आहे. काल बाजार वार्ड येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *