गडचिरोली(प्रति): गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयात विलगीकरणात असलेल्या सीआरपीएफ बटालियन ११३ मधील ५ जवानांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह मिळाले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश-२, आन्ध्र प्रदेश-१, कुरखेडा-१, औरंगाबाद-१ येथील जवानांचा समावेश आहे.यामुळे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ५३ झाली. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या ११६ झाली आहे. गडचिरोलीत असलेल्या एकुण सर्व ६१ रुग्णांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरु आहेत. यामध्ये ८ जिल्ह्याबाहेरील आहेत.
Related Articles
अत्यावश्यक खरेदीवेळी सामाजिक अंतराची गरज
गडचिरोली (प्रति)शहरातील नागरिक अत्त्यावश्यक साहित्य खरेदीसाठी एकाच वेळेला गर्दी करीत असल्याने किराणा, मेडिकल व भाजीपाला खरेदी करतांना सामाजिक अंतर ठेवण्यासाठी चौकटी निर्माण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. देशात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून या संसर्गजन्य रोगामुळे जनतेच्या मनात चांगलीच भीती निर्माण झाली आहे. कोरोना पासून बचाव करण्याच्या हेतूने भाजीपाला, मेडिकल व किराणा साहित्य खरेदीसाठी […]
कोटयावधीची रोकड जप्ती प्रकरणात कंत्राटदाराच्या मॅनेजरला अटक
प्रतिनिधी /गडचिरोली :गडचिरोली जिल्हयाच्या तेलंगाणा सिमेवर दोन वाहनातून २ कोटी २० लाखाची रक्कम जप्त करण्यात आली आहे. यापैकी १ कोटी २० लाखाची रक्कम नक्षल्यांना देण्यासाठी नेण्यात येत होती या निष्कर्षातून पोलीसांनी चौकशी सुरू केली आहे. रोकड जप्त प्रकरणात तेंदूपत्ता कंत्राटदार, मॅनेजर व दोन वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी कंत्राटदाराच्या मॅनेजरला पोलीसांनी […]
*गडचिरोलीत वडसा तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण; मुंबईहून आलेला एकजण कोरोना बाधित*
जिल्हयातील एकुण बाधित संख्या ५२; आत्तापर्यंत ४० डिस्चार्ज तर सक्रिय कोरोना बाधित ११. *गडचिरोली* : काल रात्री वडसा तालुक्यातील नव्याने १ कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ११ झाली. वडसा येथील २६ वर्षीय युवकाला जिल्ह्यात आल्यानंतर वडसा येथील संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. वाशी मुंबई येथून ६ जून ला एकूण २९ प्रवासी […]


