गडचिरोली (प्रति ) : जिल्हयात काल रात्री उशिरा 23 व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह मिळाले.यातील सर्व व्यक्ती बाहेरील जिल्हा व राज्यातील आहेत, यामध्ये गडचिरोली जिल्हयातील एकही व्यक्ती नाही. यामध्ये 22 जवान सीआरपीएफ बटालियनचे आहेत व 1 व्यक्ती भंडारा जिल्हयातील असून नोकरीत रूजू होण्यासाठी भामरागड येथे दाखल झाला होता. यातील सर्व 23 ही व्यक्ती पुरूष आहेत. सर्वांना जिल्हयात आल्यानंतर यामध्ये सीआरपीएफला कृषी महाविद्यालय गडचिरोली येथे तर भामरागड येथील एका व्यक्तीला भामरागडमध्येच संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या सर्व रूग्णांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. असे असले तरी सर्वच रूग्ण बाहेरील राज्य व जिल्हयातील असल्यामुळे त्यांच्या नोंदी त्या त्या जिल्हयात तसेच राज्यात करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंतची एकुण बाधित संख्या ७३च राहणार आहे. सदर रुग्णांच्या नोंदी पोर्टल वर सायंकाळपर्यंत राज्य स्तरावरून त्या त्या ठिकाणी अपडेट केल्या जाणार आहेत. २३ पैकी ७ नोंदी राज्य स्तरावरून मंजूर झाल्याने त्या त्या जिल्हयात शिफ्ट केलेल्या आहेत. उर्वरीत नोंदी शिफ्ट करणार असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
Related Articles
गडचिरोली जिल्हयात 4 मृत्यूंसह नवीन 95 कोरोना बाधित
*आज 61 जण कोरानामुक्त* *गडचिरोली दि.27 सप्टेंबर* : आज जिल्हयात 4 कोरोनामुळे मृत्यूंची नोंद झाली. तसेच नवीन 95 जण कोरोना बाधित आढळले. एकुण सक्रिय कोरोना बाधितांपैकी जिल्हयात वेगवेगळया तालुक्यातील 61 जण कोरोनामुक्त झाले. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधित संख्या 642 झाली. आत्तापर्यंत एकुण बाधित 2514 रूग्णांपैकी 1852 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 20 जणांचा […]
गडचिरोली जिल्हयात आज एका मृत्यूसह 35 नवीन कोरोना बाधित
*तर आज 50 जण कोरोनामुक्त *गडचिरोली,(जिमाका)दि.08*: आज जिल्हयात 35 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 50 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8321 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 7831 वर पोहचली. तसेच सद्या 401 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 89 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद […]
गडचिरोली जिल्हयात आज 131 जण कोरोनामुक्त तर नवीन 80 बाधित
वडसा तालुक्यातील 61 वर्षीय मधुमेहग्रस्त वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू *गडचिरोली, दि. 19 ऑक्टो*. : आज तब्बल 131 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. तसेच गडचिरोली शहरातील नवीन 43 कोरोना बाधितांसह जिल्हयात 80 नवीन कोरोना बाधितांची भर पडली. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 4626 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 3802 वर पोहचली. तसेच सद्या 787 […]



