चंद्रपूर (का. प्र ):चंद्रपूर शहर महानगर पालिकेची सर्वसाधारण सभा आज ३० जून २०२० रोजी पार पडली या सभेत माजी अर्थ व नियोजन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या लॉकडाऊन मध्ये ज्या नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा ३१ मार्च २०२० पर्यंत केलेला नाही. त्यांना ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ द्यावी व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दंड किंवा शास्ती आकारू नये असे निर्देश महापौर राखीताई कंचर्लावार यांना दिले. या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश महापौरांनी आयुक्तांना दिले असून आता नागरिक ३१ डिसेंबर पर्यंत मालमत्ता कर भरू शकणार आहे.
Related Articles
मनपा प्रशासनाने चंद्रपूरात शिशु रूग्णालय उभारणीसाठी आवश्यक तयारी तातडीने करावी – आ. सुधीर मुनगंटीवार जागा निश्चीतीचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांकडे सादर – मनपा आयुक्तांची माहिती आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली ऑनलाईन आढावा बैठक
कोरोनाची तिसरी संभाव्य लाट आणि त्यात लहान मुलांना प्रामुख्याने धोका संभावणार असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे. कृती दलाने सुध्दा ही भिती व्यक्त केली आहे. यादृष्टीने प्रभावी उपाययोजना म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने सर्व सुविधांनी युक्त असे शिशु रूग्णालय उभारावे अशी अपेक्षा आपण मनपाच्या आसरा कोविड रूग्णालयाच्या उदघाटन समारंभात व्यक्त केली होती. यादृष्टीने मनपा प्रशासनाने आवश्यक […]
आपल्या घरी डेंग्युची सुरवात तर नाही ना, मनपा सर्व्हेत १०८८५ घरांची तपासणी
३० टक्के घरांमध्ये आढळली डासांची अंडी चंद्रपूर २२ जुन – डेंग्यु व इतर कीटकजन्य आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत घरोघरी केल्या जाणाऱ्या कंटेनर सर्वेमध्ये ३० टक्के घरांमध्ये डासांची अंडी आढळली आहेत. सध्या पावसाळ्याची सुरवात असुन डेंग्यु व इतर कीटकजन्य आजार पसरु नये या दृष्टीने मनपामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. मनपा आरोग्य विभागामार्फत एमपीडब्लू, […]
चंद्रपूर शहराला अस्वलने मारला फेरफटका
चंद्रपूर (का.प्र) चंद्रपूर शहरात लॉकडाऊन प्रभाव असत्तांना चंद्रपूर शहरात अस्वलाने प्रवेश केला. या बाबत वृत्त असे कि हे अस्वल दिसताच रात्रीपासून वनविभाग व इको प्रोच्या टीमने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला हे अस्वल हॉस्पिटल जवळ कचऱ्याच्या ढीगाऱ्याजवळ फिरत होते. नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. ह्या अस्वलाने रात्री १ वाजताच्या सुमारास जटपूरा गेट, रेल्वे स्टेशन, कॉलेक्टर […]



