चंद्रपूर (का.प्र.) : गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथे वाघाचा हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या मृत व्यक्तीचे नाव दिनकर ठेंगरे आहे. तोहोगांव येथे वास्तव्य करत असलेले दिनकर ठेंगरें हे नेहमीच शेतात जात असे. त्याचे शेत जंगलाला लागलेले आहे. काल दि. 27/06/2020 रोज शनिवारला नेहमी प्रमाणे शेतात गेले. सायंकाळ झाली तरी मात्र ते परत आलेच नाही. मग घरच्यांनी दिनकर चा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र कुठच त्यांचा पत्ता लागत नव्हता. आज सकाळी 8 वा. च्या सुमारास त्याचा मृतदेह जंगलात सापडला असून त्याचा शरीरावर वाघाचे हल्ले दिसून आले. ही घटना गावात कळताच गावकऱ्यांनी जवळच्या पोलिस स्टेशन व वन अधिकाऱ्याला फोन करून कळविले. ही घटना घडताच गावा लगत परिसरात वाघाची दहशत पसरली आहे.
Related Articles
वाघाचे नख विक्रीसाठी ग्राहक शोधणाऱ्या दोन युवकांना अटक
गुन्हे अन्वेंशन पथकाची कारवाई वनविभागाकडे केले सुपूर्द भद्रावती,दि.2( तालुका प्रतिनिधी)वाघाचे नख विक्रीसाठी ग्राहक शोधणाऱ्या दोन युकांना भद्रावती पोलीस स्टेशनच्या गुन्हे अन्वेंशन पथकाने मोठ्या शिताफीने रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून वाघाचे एक नख जप्त करून त्यांना वनविभागाच्या स्वाधीन केले आहे.भद्रावती शहरातील गुरूनगर वस्तीत दोन युवक वाघाचे एक नख विकण्यासाठी ग्राहक शोधत आहेत,अशी गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. त्यानुसार […]
चंद्रपूर जिल्ह्यातील सहा पोलीस निरीक्षकाच्या बदल्या”>चंद्रपूर जिल्ह्यातील सहा पोलीस निरीक्षकाच्या बदल्या
चंद्रपूर- जिल्ह्यातील सहा ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांचे विनंती नुसार बदल्या खालील प्रमाणे करण्यात आले आहेत. पो. नि.प्रवीण कुमार पाटील आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांची बदली वाहतूक शाखा चंद्रपूर करण्यात आली. पो.नि.जि. व्ही भारती गडचांदूर ठाणे यांची नियुक्ती भद्रावती करण्यात आली. पो.नि.एम.सी.गभणें भिसी ठाणे यांची बदली चिमूर येथे करण्यात आली. पो.नि आर.एम शिंदे चिमूर यांची नियुक्ती जिल्हा […]
६३ शिवसैनिकांनी रक्तदान करून साजरा केला आपल्या नेत्याचा वाढदिवस …
ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीने वेधले लक्ष….. सर्व शिवसैनिक कार्यकर्त्यांचे आभार, सदैव जनतेच्या कामासाठी तत्पर राहील – बबन उरकुडे शिवसेना राजुरा विधानसभेचे नेते बबन उरकुडे यांच्या वाढदिवसानिमित्य भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण क्षेत्रातून आलेले बबन उरकुडे हे तंटामुक्ती अध्यक्ष-ग्रा. प सदस्य, उपतालुका प्रमुख-तालुका प्रमुख-उपजिल्हाप्रमुख ते आता विधानसभा समन्वयक असा प्रवास करत आज […]



