गडचिरोली

अहेरी तालुक्यात एक कोरोना बाधित,जिल्ह्याची संख्या ५४ वर

गडचिरोली(प्रति): जिल्हयातील एकुण बाधित संख्या ५४ झाली असून आत्तापर्यंत ४२ जणांना डिस्चार्ज दिला आहे तर सक्रिय कोरोना बाधित ११आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील नव्याने १ कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ११ झाली.
अहेरी शहरातील ४५ वर्षीय व्यक्तिला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासन प्रतिबंधात्मक क्षेत्र लावणे, सदर व्यकीच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे याबाबत कार्यवाही करत आहे.. कोणीही रुग्णांची ओळख पटेल असे संदेश सार्वत्रिक करू नयेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.