चंद्रपूर (का.प्र.): भरकटुन लोकवस्ती मध्ये आलेल्या भेडकीवर कुञ्यांनी हल्ला करून ठार केल्याची घटना तालुक्यातील मारोडा येथे घडली. आज सकाळी ६ वा. चे सुमारास वनविभागाच्या बफर झोन मध्ये असलेल्या मारोडा येथील आदर्श खेड्या लगतच्या जंगलातून भरकटुन एक भेडकी लोकवस्ती मध्ये आली. नवीन प्राणी गांवात येताच कुञ्यांनी तिचा पाठलाग केला. गराड्यात सापडल्यानंतर काही कुञ्यांनी तीचेवर हल्ला चढविला. कुञे शेळीवर हल्ला करीत असल्याचे सागर थेरकर आणि शैलेन्द्र थेरकर यांचे लक्षात आले. त्यांनी शेळी समजलेल्या भेडकीला कुञ्यांच्या हल्ल्यातुन सोडविले. कुञ्यांच्या हल्यात जखमी झालेला प्राणी शेळी नसुन भेडकी असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जखमी भेडकीला मूल येथील वन कार्यालयात घेवुन गेले. स्थानिक वनाधि-यांशी त्यांनी संपर्क साधला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. परंतु त्याठिकाणी उपस्थित असलेले विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे महादेव मुंडे, सायस हाके, तानाजी कांबळे, मुकेश पांडव, भोजराज दांडेकर, अतुल मोहुर्ले, वर्षा पिपरे, यामीनी पोईनकर आणि सपना मडावी यांनी जखमी भेडकीला तातडीने स्थानिक पशु चिकीत्सालयात उपचारार्थ घेवुन गेले. परंतु उपचारा दरम्यान जखमी भेडकीचा मृत्यू झाला. मृत भेडकी अंदाजे दिड वर्षाची मादी प्रजातीची होती. भेडकीवर हल्ला झाल्याची घटना बफर झोन क्षेत्रातील असल्याने सदर घटनेची माहीती संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आली.


