
गडचिरोली (प्रति) दि.३१ मे सायंकाळी ८.०० वा.आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अजून ३ (तीन) अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
यातील एक रुग्ण सिरोंचा,दुसरा एटापल्ली तालुक्यातील आहे तो मुंबईहून परतला होता. तिसरा रुग्ण मुलचेरा तालुक्यातील आहे तो बुलढाणा वरून परतला होता. दोघांनाही संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते.आता एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३७ झाली आहे.


