गडचिरोली

जिल्ह्याबाहेरून आलेल्यांचा तिरस्कार न करता प्रोत्साहन देण्याची गरज :- जिल्हाधिकारी दीपक सिंगला

रेड झोन असलेल्या मुंबई पुण्यातून 2092 प्रवाशी गडचिरोलीत परतले, सर्वांना कोरोना कोव्हीड सेंटर मध्ये केलेे दाखल
प्रतिनिधी गडचिरोली:जिल्हयात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असली तरी ते आपल्याच जिल्हयातील नागरिक आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याची आता गरज आहे. बाहेरून आलेल्या प्रत्येकाने स्वत:हून इतरांपासून दूर राहणे गरजेचे आहे. स्थानिक लोकांनी त्यांचा तिरस्कार न करता त्यांना आरोग्यविषयक प्रक्रियेत आणले पाहिजे. यामध्ये प्रशासनाकडे नोंद करणे, लक्षणे असल्यास आरोग्य सेवकांकडे नोंदविणे, त्यांना घरीच राहण्यास सांगणे, ऐकत नसल्यास प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी. आपल्याच जिल्हयातील प्रवाशी परत येत आहेत त्यामुळे घाबरू नका काळजी घ्या; असेे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.

आत्तापर्यंत जिल्हयात आलेल्या 48777 प्रवांशांची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली असून त्यापैकी संभावित 576 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गेल्या आठवडाभरात मुंबई पुणे येथून जिल्हयात आलेल्या 13 लोकांच्या कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर, त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांची तपासणी व त्यांचे नमुने घेण्याचे काम प्रशासनाकडून गतीने सुरू आहे. त्यामूळे अजूनही आपला धोखा टळलेला नाही, लोकांनी आवश्यक खबरदारी घेवून, छुप्या मार्गाने जिल्हयात प्रवेश केलेल्या नागरीकांबाबत प्रशासनाला माहिती द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.