चंद्रपुर

एमएसइबी च्या पोलला आदळून ट्रकची पानटपरीला धडक

चंद्रपूर बल्लारपूर मार्गावरील अष्टभुजा शिवमंदिर जवळ असलेल्या एमएससीबी च्या पोल ला ट्रक ने धडक दिल्याने एमएससीबी चे पोल तुटले आहे.तसेच पोल ला लागूनच असलेल्या एका पानठेल्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रक चालक आपली गाडी उभी करून काही कामानिमित्त बाहेर गेला होता. अशातच ट्रक आपोआप समोर गेल्याने हि घटना घडल्याची माहिती आहे. यात एमएससीबी तसेच पानठेल्याचे मोठे नुकसान झाले आहे. यानंतर दुकान मालकाने नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.