चंद्रपूर (का. प्र ) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून आता पीपीई किट (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन नितीन मोहीते व सहाय्यक आयुक्त औषधी,अन्न व औषध प्रशासन चंद्रपूर पी. एम बल्लाळ यांनी दिली आहे मजबूत पुरवठा साखळी विकसित होईपर्यंत विक्रेत्यांशी, निर्मात्यांशी संपर्क साधण्याची जबाबदारी म्हणून अन्न व औषध प्रशासन विभाग हे काम बघणार आहे. सध्या चांडक मेडिकलच्या 6 वेगवेगळ्या दुकानात पीपीई किट उपलब्ध आहेत. यासंदर्भात ऑर्डर दिल्यास 10 मिनिटात ती उपलब्ध करून दिल्या जाऊ शकते. बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चिमूर यासारख्या प्रमुख तालुक्यात एका दुकानात पीपीई किट उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यातील मेडिकल स्टोअर विक्रेत्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन, अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.सामान्य नागरिकांना पीपीई किट उपलब्ध होणार नसून फक्त जिल्ह्यातील डॉक्टर, नर्सेस, खाजगी दवाखाने, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कोरोनाच्या काळात पीपीई किट गरजेची आहे. त्यामुळे आता पीपीई किट सहज उपलब्ध होणार आहे.
Related Articles
*चंद्रपूरमध्ये 24 तासात 67 कोरोना पॉझिटीव्ह*
आतापर्यत एकूण बाधितांची संख्या 749 426 बरे ;321 बाधितांवर उपचार सुरू *ब्रम्हपुरी तालुक्यातून 28 बाधित आले पुढे* चंद्रपूऱ दि. 6 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 67 रुग्ण पुढे आले आहे. आज सर्वाधिक बाधित हे ब्रह्मपुरी तालुक्यातील आहे. या एकाच तालुक्यातून 28 बाधित पुढे आले आहे. बहुतेक बाधित हे 19 ते 40 […]
ओबीसी च्या सर्व न्याय व संवैधानिक मागण्या मान्य होणार : मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे
*मुख्यमंत्री व ओबीसी नेत्यांची मुंबई येथे बैठक संपन्न चंद्रपुर : दि. 7 डीसेंबर 2020 ला मुंबई येथील हीवाळी अधिवेशनावर धडकणा-या ओबीसी समाजाच्या मोर्चाची तातडीने दखल घेवुन राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. उध्दवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांना काल (दि.20) ला आमंत्रित केले होते. यावेळी मुख्यमंत्री मा. श्री. उध्दवजी ठाकरे व राज्याचे ईतर मागास बहुजण कल्याण मंत्री […]
चंद्रपूर जिल्ह्यातील आजचे कोरोना अपडेट्स
*जिल्ह्यात गेल्या २४ तासात २७४ जण कोरोना बाधित *जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या -८०९० *आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या -४६२७ *सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या -३३४५ *आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ११८ जिल्ह्यातील (१११) बाहेरील (७) *जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करा. *सोशिअल डिस्टंसिंग चे पालन करून. मास्कचे वापर करावे. *अत्यावश्यक कामानीच बाहेर पडावे. *घरी […]



