कोरपना (प्र.ती.) कोरपना कडून रूपापेठ येथे जाणाऱ्या दुचाकी वाहनाचे नियंत्रण सुटल्याने स्लीप झाली.यात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी असल्याची घटना आज बुधवार २७ मे रोजी कोरोना-आदिलाबाद मार्गावरील पार्डी येथील शिवमंदिर जवळ घडली.प्राप्त माहितीनुसार मृतक प्रकाश बापूराव जुमनाके (२२) व गंभीररीत्या जखमी सुरज दौलत सिडाम (२२)राहा. मानोली (खु.)हे दोघेही लग्ना निमित्य मानोली वरून रूपापेठ साठी निघाले होते दरम्यान पारडी जवळ त्यांची दुचाकी एम एच ३४एक्स ३७४१ हि भरधाव वेगात असल्याने वाहनावरून नियंत्रण सुटले. व हा अपघात झाला.
Related Articles
2020 भरती प्रक्रियेतील पोलीस उपनिरीक्षकांची मेरीट लिस्ट प्रकाशित करा – आ. किशोर जोरगेवार
आमदार किशोर जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत केली मागणी 2020 साली पोलिस उपनिरिक्षक पदाकरिता झालेल्या परिक्षेचा निकाल अद्यापही जाहिर करण्यात आलेला नाही. सदर प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने निकाल जाहिर करण्यात विलंब होत आहे. मात्र आता यामुळे सदर परिक्षा देणा-या उमेदवारांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे याची दखल घेत न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून सद्यास्थितीत […]
वर्षभरात 12 हजार रुग्णांवर मोफत उपचार
आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजना उपचारापोटी राज्य सरकारकडून 26 कोटी 61 लक्ष रुपयांचा लाभ चंद्रपूर, दि. 21 : आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात गत वर्षभरात एकूण 12059 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. या रुग्णांच्या उपचारापोटी राज्य शासनाकडून 26 कोटी 61 लक्ष 78 हजार […]
पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन नागपूरात घ्या – आ किशोर जोरगेवार
दोन वर्षापासून नागपूर हिवाळी अधिवेशन झालेले नाही. त्यामूळे आता होणार असलेले पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन नागपूरात घेण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात बोलतांना केली आहे. आज सभागृहाचे विशेष सत्र बोलावत राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी सर्व अपक्षांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतांना आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. महाराष्ट्र राज्याची […]



