चंद्रपूर (का . प्र ) चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट आली असून आज दि. २६ मे रोजी राजुरा येथील भारत चौकात राहणारा शफिक शेख इमाम या २७ वर्षीय युवकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. स्थानिक भारत चौक येथील रहिवाशी शफिक शेख इमाम वय २७ या युवकाचा उष्माघाताने दूर्देवी मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसापासून राजुरा भागात भीषण उन्हाचा तडाखा नागरिकांना बसत आहे. येथील तापमान ४५ डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त गेल्याची माहिती आहे. शफिक हा गरीब कुटुंबातील युवक येथील एका दुकानात काम करतो. हा युवक उन्हात फिरल्यानंतर त्याची प्रकृति बिघडली . त्याला दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यात तापमान प्रचंड वाढले असून ४६ ते ४७ डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. काळ पासून नवतपा सुरु झाला आहे. तरी नागरिकांनी उन्हात कमीत-कमी निघावे. व उष्णेपासून स्वतः बचाव करावा
Related Articles
सावरकरांच्या प्रेरणेतून अनेक क्रांतीकारक घडले – रंजना वेलंकीवार
स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंती पर्वावर अभिवादन…! चंद्रपूर-स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांची 140वी जयंती भाजपा पदाधिकारी व सावरकर प्रेमिंच्या भरगच्च उपस्थितीमधे साजरी करण्यात आली. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या जयंती उत्सवात उपस्थितांनी स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. स्थानिक जिल्हा पोलिस मुख्यालयासमोरील स्वातंत्र्यवीर सावरकर चैकामध्ये दि. […]
कर्तृत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याला अधिक ऊंची प्राप्त करुन देण्यासाठी पुढे यावे – ना सुधीर मुनगंटीवार
“सत्तेसाठी प्रत्येक वेळी खोटी आश्वासने देवून जातीधर्मात भेद निर्माण करणाऱ्याला कॉंग्रेस ला सत्तेपासून दूर ठेवावे लागेल; प्रत्येक हाताला काम, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दाम, पायाभूत सुविधांसह गरीब-कल्याणकारी योजना वेगवान ही कार्यपद्धती अवलंबून भारताला नऊ वर्षात जागतिक स्तरावर सन्मान प्राप्त करुन देणाऱ्या कर्तुत्वान विश्वगौरव, युगपुरुष प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्याला अधिक ऊंची प्राप्त करुन देण्यासाठी पूर्ण शक्तीने […]



