घरून भांडण करून निघाला होता देवणाथ
सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जवळ पवनपार गावातील नहराचा रस्त्याच्या कडेला असलेल्या मोहाचे झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज 7 जुन मंगळवार ला सकाळी दहा वाजता उघडकीस आले. सविस्तर वृत्त असे की,
मृतक नाव देवनाथ वाढई वय पंचवीस वर्ष राहणार पवनपवार तालुका सिंदेवाही असे असून काल रात्री सोमवार ला सात वाजता दरम्यान देवनाथ वाढई हा घरी भांडण करूण घरून निघून गेला त्यानंतर तो आलाच नाही. त्याच्या घरच्यांनी इतरत्र गाव परिसरामध्ये शोधाशोध केली असता तो मिळून आला नाही. आज पहाटे सकाळी दहा वाजता दरम्यान तो पवनपार गावा जवळील नहरा जवळ असलेल्या रस्त्यावरील मोहाच्या झाडाचा फादीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केले दिसले. या घटने ची माहिती सिंदेवाही पोलीस स्टेशनला मिळताच त्यांनी तात्काळ घटनेचा व घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृतकाचे शव उत्तरीय तपासणी व शवविच्छेदना करता रुग्णालयात पाठवले आहे. प्राथमिक तपास ASI गेडाम करीत असुन. पुढील तपास सिंदेवाही पोलिस करीत आहेत.





