चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

१ जुलैपासून ताडोबा पर्यटनासाठी बंद….

३० जूनपर्यंतची बुकिंग फुल्ल
चंद्रपूर जंगलातील कच्च्या रस्त्यांमुळे पावसाळ्यात व्याघ्रसफारी करण्यास मोठ्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे दरवर्षीच पावसाळ्यात • सुमारे तीन महिने ताडोबा पर्यटनासाठी बंद असतो. यंदाही १ जुलैपासून ताडोबा पर्यटनासाठी बंद राहणार आहे. ३० जूनपर्यंतची ऑनलाइन बुकिंग फुल्ल असून, १ जुलैपासूनची कोअर क्षेत्राची ऑनलाइन बुकिंग बंद करण्यात आली आहे.
हमखास व्याघ्र दर्शनासाठी चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहे. त्यामुळे देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे पर्यटनासाठी येत असतात. जंगलातील कच्च्या रस्त्यांमुळे व्याघ्रप्रकल्प पावसाळ्यात बंद ठेवण्यात येतात. मातींचे रस्ते असल्याने संरक्षित जंगलांमध्ये भ्रमंती करणे कठीण असते.

Leave a Reply

Your email address will not be published.