चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

महावीतरणचा अभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात….

वरोरा – डिमांड काढून देण्याच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपणीमधील सहायक अभियंता वरोरा येथील श्रीनू चुक्का यांना 6 हजार रुपयांची लाच घेताना चंद्रपूर लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली.

फिर्यादी हे वरोरा येथील रहिवासी असून सोलर सिस्टम फिटिंग व इलेक्ट्रिशियन चे कामे करतो, सोबतचं ग्राहकांच्या घरी सोलर सिस्टम लावण्याचे काम करीत असून त्यासाठी डिमांड काढण्याच्या कामासाठी सहायक अभियंता चुक्का यांनी फिर्यादीला 6 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. फिर्यादीला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.

लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांनी प्रकरणाची पडताळणी करीत सापळा रचला व महावितरण कार्यालय वरोरा येथे 27 जून ला फिर्यादीकडून श्रीनू चुक्का हे 6 हजार रुपये घेत असताना लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published.