![]()
चंद्रपूर – श्री हनुमान जयंती निमित्त राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर महानगरातील विविध हनुमान मंदीरांना भेट देवून दर्शन घेतले. यावेळी उपस्थित भाविकांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
बिनबा गेट बाहेरील रुईबन हनुमान मंदीरास भेट देवून हनुमानजींच्या मुर्तीला पुष्पहार घालून पुजाअर्चना केली. यावेळी आयोजित महाप्रसादाचा उपस्थितांसोबत आस्वाद घेतला. लालपेठ परिसरातील गोमूख हनुमान मंदीर, क्रिष्णानगर, नेहरुनगर, तुकूम व लखमापूर, घोडपेठ, भद्रावती येथील मंदीरात जावून बजरंगबलीचे दर्शन घेतले सर्वांना सुखी, समाधानी व निरोगी ठेवण्याची प्रार्थना केली. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपा पदाधिकारी माजी उपमहापौर अनिल फुलझेले, माजी नगरसेवक विठ्ठलराव डुकरे, पुनम तिवारी, गौतम यादव, दिनकर सोमलकर, रामजीवनसिंह परमार, संतोष वडपल्लीवार, राज सारिडेक यांचेसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.




