चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

80 हजाराच्या सागवान लाकडासह दोन आरोपी अटकेत : दोन फरार

राजुरा वन विभागाची कारवाई.
राजुरा:– अवैधरित्या सागवान तोडून नेऊन फर्निचर व्यवसायिक मालकास सागवान लाकडे विकणारे आरोपीस ताब्यात घरून व फर्निचर व्यवसायिकचे घरी धाड टाकून सुमारे 80 हजार रुपयांचा मुद्देमालासह सागवान जात साईज जप्त करण्यात आले असून यातील फर्निचर व्यवसायिक सह इतर एक आरोपी फरार झाला आहे. वन विभाग फरार आरोपीचा तपास करीत आहेत.
    दिनांक रोजी 20 जुलै रोजी राजुरा नियत वनरक्षक नियमित गस्त करीत असताना राखीव वनांच्या कक्ष क्रमांक 156 मध्ये सायकलद्वारे अवैधरित्या सागवान झाडे तोडून लाकडाची तस्करी करीत असताना आढळून आले त्याचा पाठलाग करून त्यातील विजय आत्राम, बंडू कोडापे दोघेही राहणार इंदिरानगर यांना ताब्यात घेतले आणि वन कार्यालयात आणून चौकशी केली असता त्यावरून राजुरास्थित इंदिरानगर येथे वनकर्मचाऱ्यानी धाड टाकून तपासणी केली असता अवैधरित्या तोड झालेली सागवान लाकडे व त्याचे कट साईज आढळून आले. यावेळी हा फर्निचर व्यवसायिक फरार होण्यात यशस्वी झाला. घटनास्थळावरून सुमारे 80 हजार रुपयांचा सागवान लाकडे व इतर अवजार वन कर्मचाऱयांनी जप्त केले. याप्रकरणात वन गुन्हा नोंदवून दोन आरोपींना अटक केले असून इतर फरार आरोपीचा तपास वन कर्मचारी करीत आहेत.
   ही कारवाई उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू ,सहायक वन संरक्षक श्रीकांत पवार,यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड,क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते नियत वनरक्षक पवन मंदुलवार,आणि वनरक्षक करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.