चंद्रपुर

सूर्या खजांची यांचे ६१ व्या जन्मदिनी फळ वाटप

चंद्रपूर (का.प्र.)सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाèया सूर्याताई खजांची यांनी नुकताच आपला जन्मदिन केक कापून साजरा न करता ६१ व्या जन्मदिवसानिमित्त ६१ लोकांना फळ वाटप करून साजरा केला. सध्या देशात कोरोनाचा प्रसार होत आहे. देशात लॉकडाऊन आहे. तेव्हा आपण अल्पशा का होईना गरजूंना हातभार लावावा. या उद्देशाने जन्मदिवस फळ वाटप करीत साजरा केला. त्यांची मुलेही पंकज खजांची, राजीव खजांची यांनी निरनिराळ्या संघटनाद्वारा गरीबांना, गरजूंना किट्स वाटपाचे कार्य करीत आहे. त्यांचे म्हणणे असेच आहे की लॉकडाऊनच्या त्यांच्या जन्मदिवसानिमित्त व त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे परिस्थितीत प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या प्रकारे गरजूंना मदत करावी, महाविदर्भ वृत्त समूहाकडून अभिनंदन.

Leave a Reply

Your email address will not be published.