चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

सास्ती राजुरा मार्गावरील जड वाहतूक बंद करण्याच्या मागणीला घेऊन रस्ता रोको

राजुरा : भरधाव ट्रकने वैद्य परिवाराला ट्रक खाली चिरडल्याने एकाच कुटुंबातील तीन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यासाठी व सास्ती – राजुरा मार्गावरील जडवाहतुक बंद करणे, रस्ता दुरुस्ती करणे, रस्त्यावर पथदिवे लावणे या मागणीला घेऊन बल्लारपूर मुख्य महाप्रबंधक कार्यालय धोपटाळा येथे आज (दि. १४) रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या मार्गावरून वेकोलिची कोळसा वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. कोळसा वाहतूक करताना ट्रक चालक क्षमतेपेक्षा जास्त कोळसा वाहून नेत असताना अनेकदा ट्रकमधील कोळसा रस्त्यावर पडत असतात यात रस्त्यावरून ये – जा करणाऱ्या वाहनधारकांच्या अंगावर कोळसा पडल्याने अनेकदा छोटे वाहन चालक जखमी झाले आहे. मात्र याकडे ना वेकोली लक्ष देत ना पोलिस प्रशासन लक्ष देत. यासंबंधीत कारवाही करणारे उपप्रादेशिक परिवहन विभाग सुद्धा या जडवाहणाकडे लक्षच देत नसल्याने ट्रान्सपोर्ट व वाहन चालक बिन्धास्त असल्याचे दिसून येत आहे. यामुळे भरधाव वेगाने वाहन चालत असल्याने या मार्गावर अनेक अपघात झाले आहे.
रामपुर सास्ती मार्गावरील धोपटाळा वसाहत समोरील मुख्य महाप्रबंधक कार्यालयाच्या समोर दुपारी एक वाजता परिसरातील शेकडो नागरिकांनी रस्त्यावर उतरून रस्ता अडविला. यावेळी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त लावला होता. आंदोलनकर्त्यांशी परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक विशाल नागरगोजे, पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाकडे यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता आंदोलनकर्ते वृत्त लीहिपर्यंत आपल्या मागण्यांवर ठाम होते.

Leave a Reply

Your email address will not be published.