चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

*सामाजिक कार्यात “संकल्प” संस्था अग्रेसर*

संकल्प संस्था चंद्रपूरच्या परिसरात आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन                                              सोहळा संपन्न.

चंद्रपूर – “संकल्प” संस्था चंद्रपूर येथे मा. आमदार श्री. किशोरभाऊ जोरगेवार यांच्या हस्ते दिनांक १९ मे रोजी इंदिरानगर, मुल रोड येथील संस्थेच्या परिसरात भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला.  याप्रसंगी “शासनाच्या अनेक योजना असतात त्या लोकापर्यंत पोहोचल्या पाहिजे. विवीध उपक्रमाची व प्रशिक्षणाची आज आवश्यकता आहे. महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम  राबवले गेले पाहिजे आणि ते कार्य संकल्प संस्थेने केले आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. संस्थेचे कार्य मी अनेक वर्षांपासून जवळून बघत आहे. हे कार्य मोठे आहे. समाजाला आपले देणे लागते. याचे भान सर्वांनी जपले तर कुणीही समाजात वंचित राहणार नाही. प्रत्येकाने आपल्या कार्यातून सामाजिक सेवा देण्याचा संकल्प केला पाहिजे”. असे प्रतिपादन आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी केले व त्यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. “संकल्प” संस्थेतर्फे मागील अनेक वर्षापासून शिवणकला प्रशिक्षण, योगा, आरोग्य, दिव्यांग सल्ला व पुनर्वसन, बाल मजुरांचे शिक्षण,कौशल्य विकास, महिला सक्षमिकरण, हृदयरोग शस्त्रक्रिया मार्गदर्शन असे विविध समाजपयोगी उपक्रम राबवले जातात. या कार्याला आणखी गती देण्यासाठी संकल्प संस्था तर्फे अनाथालय, वृध्दाश्रम, दिव्यांग निवासी व्यवस्था करण्याकरिता इमारत बांधण्यासाठी आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून पंचवीस लाखाचे वसतिगृह बांधण्यासाठी फार मोठे सहकार्य केले आहे”. असे संकल्प संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. अशोक वासलवार यांनी प्रास्ताविकेतून बोलतांना सांगितले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून  आमदारसाहेब श्री. किशोरभाऊ जोरगेवार, डॉ. अशोक वासलवार, डॉ. विलास झुलूरवार, डॉ. सिमला गजर्लावार, डॉ. राकेश कोलावार, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या संपूर्ण यशस्वीतेसाठी संकल्प संस्थेचे व्यवस्थापक श्री. कुंदन सतीश खोब्रागडे व शशिकांत म्हस्के, एकनाथ रासेकर, चिंतामण येवले, नानाजी चटकी, दौलत पंडीले, वासुदेव शेंडे, हेमराज चौधरी, नानाभाऊ गरमडे, संजय गरमडे, विलास पिंपळकर, सुरज बिस्वास, सौ.प्रभा गजभे, सौ.सुनीता कावळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महीला व पुरुष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन स्वप्नील मेश्राम तर आभार डॉ. सिमला गजर्लावार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *