
चंद्रपूर (का.प्र.)देशभरात कोरोनाचे संकट कायम असून त्यावर उपाय योजना करीत केंद्र सरकार सह सर्व राज्य सरकार तत्पर आहे. मात्र दिवसेंंदिवस वाढते संकट बघता आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याने केंद्र सरकार सह राज्य सरकारने मदतीचे आवाहन केले. यानुसार देशभरातील अनेक ट्रस्ट, सामाजिक संघटना तसेच व्यक्तिशः अनेकांनी पुढाकार घेतला आहे. चंद्रपुरातील श्री साईबाबा मंदिर निर्माण मंडळ, साईबाबा वार्ड सिव्हील लाईन चंद्रपूर तर्फे १ लाख ११ हजार रू.चा धनादेश मुख्यमंत्री कोरोना सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केला. तसेच शहरातील नामवंत श्री. रमेश एम. कोतपल्लीवार यांनी ५१ हजार रू.चा धनादेश मदत निधीकरीता दिला.


