चंद्रपुर

मशिदीमधील ११ तुर्कीस्तानीवर गुन्हा दाखल

चंद्रपूर (का.प्र.)२५ मार्चला तुकूम परिसरातील एका मशीदीमध्ये अकरा तुर्कीस्तानी नागरिक व देशातील विविध शहरातून (दिल्ली व ओडिसा १) अश्या एकूण १३ व्यक्ती लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ताब्यात घेतल्यावर त्यांच्याकडे व्हिसा असल्याकारणाने त्यांना सोडून देण्यात आले होते. परंतु आता प्रशासनाला आल्याची माहिती दिली नाही व त्यांच्याकडे असलेला व्हिसा हा पर्यटनासाठी होता व धार्मिक कार्यक्रमात सामील होण्याची कोणतीही परवानगी नसल्याचे तपासणीत समोर आले. मात्र ते धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याचे तपासात पुढे आले. त्यानंतर आज बुधवार शहर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर विदेशी नागरिक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांना विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.