चंद्रपुर

विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

चंद्रपूर : प्रतिनिधी राज्यातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवार (दि. ९) रोजी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी ‘शाळा बंद’ व ‘सामूहिक रजा’ आंदोलनाला चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या पार्श्वभूमीवर पुरोगामी शिक्षक समितीसह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले.

आंदोलनादरम्यान टीईटी/सीटीईटी उत्तीर्ण असूनही सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदोन्नती प्रक्रियेत डावलले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच शिक्षकांवर सक्तीने लादण्यात येणारी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व इतर अशैक्षणिक कामे तातडीने बंद करण्यात यावीत, जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि संचमान्यतेचे जाचक धोरण रद्द करावे, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या.

दरम्यान, शाळा बंद ठेवणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांच्या वेतनात कपात करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत शिक्षकांनी आंदोलनात सहभागी होत आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *