चंद्रपुर

रामनगर पोलिसांची कारवाई : प्रतिबंधित सुगंधित तंबाखूसह आरोपी अटकेत; ₹६७,७५० चा माल जप्त

रामनगर पोलिसांची कारवाई : प्रतिबंधित सुगंधित तंबाखूसह आरोपी अटकेत; ₹६७,७५० चा माल जप्त

चंद्रपूर : रामनगर पोलिसांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधित तंबाखू अवैधरित्या साठवून विक्री करणाऱ्यावर धडक कारवाई करत ₹६७ हजार ७५० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तोफीक करीम भिमानी (वय ३६, रा. नुरी मस्जिदजवळ, रहेमतनगर, चंद्रपूर) याला अटक करण्यात आली आहे.

रामनगर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर ८ जुलै रोजी रात्री ९.२५ वाजता आरोपीच्या राहत्या घरी पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. यावेळी त्याच्या ताब्यातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली होला, ईगल व क्रेझ या ब्रँडची सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली. जप्त मालाची एकूण किंमत ₹६७,७५० इतकी आहे.

या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९०५/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील संबंधित कलमान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात रामनगर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राखुंडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *