

मुल – विदर्भ अजूनही विकासापासून कोसो दूर आहे. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोई नाही. मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांनी शेती पंपची डिमांड भरूनही विद्युत कनेक्शन लावण्यात आलेले नाही. विदर्भातील हजारो शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळालेले नाही. वन्यप्राणी शेतकऱ्यांचे बळी घेत आहेत तरी वाघाचा बंदोबस्त करण्यात वनविभाग निकामी ठरत आहे. याकरिता विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी, नक्षलवाद्याला आळा घालण्यासाठी, प्रदूषण व कुपोषण संपविण्यासाठी आणि बेरोजगाराच्या रोजगारासाठी विदर्भ मिशन 2023 अंतर्गत विदर्भ निर्माण यात्रा कालेश्वर ते नागपूर असा प्रवास करणार आहे. ही विदर्भ निर्माण यात्रा दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी मूल शहरात पोहचली.
यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झालेच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. मूल शहरातील विदर्भ वादी कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
यामध्ये केंद्र सरकारने विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे, विजेचे दरवाढ राज्य सरकारने सरकार मागे घ्यावी, शेती पंपाला दिवसाचे लोड शेडिंग बंद करावे, ओला दुष्काळ जाहीर करावे. वैधानिक विकास मंडळ नको विदर्भ राज्य हवे अन्नधान्यातील जीएसटी तात्काळ रद्द करावी अशा विकासात्मक विविध मागण्या या यात्रे दरम्यान करण्यात आल्या. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी भूमिका विदर्भातील मंत्री घेत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी विदर्भ वेगळा समिती आक्रमक झाल्याचे दिसून आले.



