चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

डॉ. बाबासाहेबांच्या त्याग व साहित्य संपदेतून प्रेरणा घेत प्रत्येकांनी प्रगती व ज्ञानाच्या कक्षा प्रशस्त कराव्यात – हंसराज अहीर

हंसराज अहीर यांनी वाहिली महामानवास आदरांजली….

चंद्रपूर :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी खुप मोठा त्याग केला. वंचित, शोषित, पिडीत व अज्ञानी समाजाला स्वाभिमानी बनवून त्यांना न्याय, अधिकार मिळवून देण्याकरिता आपले सर्वस्व अर्पण केले. सामाजिक क्रांतीची मशाल प्रज्वलित केली. या महामानवाच्या त्यागातून प्रत्येकांनी प्रेरणा घेत राष्ट्राच्या उन्नतीमध्ये योगदान द्यावे. डॉ. बाबासाहेबांनी या देशातील लोकांना विविध क्षेत्रात ज्ञानोपासना करण्यास विपुल साहित्याची देणगी दिली. त्यामुळे प्रत्येकांनी त्यांच्या साहित्य संपदेचा अभ्यास करुन ज्ञानाच्या व प्रगतीच्या दिशा विस्ताराव्यात असे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीपर्वावर यवतमाळ जिल्ह्यतील वणी व मारेगाव येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतांना ते बोलत होते. या जयंती सोहळ्यास वणी विधानसभेचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, देवराव भोंगळे, दिनकर पावडे, तारेंद्र बोर्डे, गजानन विधाते, विजय पिदुरकर, संजय पिंपळशेंडे, श्रीकांत पोटदुखे, बंडु चांदेकर, किशोर बावणे, नितीन चहानकर, ज्ञानेश्वर चिकटे, शंकर लालसरे, वैभव पवार, शशिकांत आंबटकर, अनुप महाकुलकर, राहुल राठोड, शशिकलाताई भारीकर, प्रशांत नांदे यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.