चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निघालेल्या रॅलीचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त शहरातुन निघालेल्या रॅलीचे गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी रॅलीत सहभागी भिमसैनिकांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शीतपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.

   या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या बहुजन विभाग महिला शहर प्रमुख विमल कातकरजिल्हा  महानगर अध्यक्ष पंकज गुप्तामहिला शहर संघटिका वंदना हातगावकरशहर युवा प्रमुख कलाकार मल्लारपयुवती प्रमुख भाग्यश्री हांडेयुवा नेते अमोल शेडेकरणसिंग बैसराम जंगमसायली येरणेसविता दंडारेकल्पना शिंदेनिलिमा वनकरमाधूरी निवलकरवंदना हजारेसुजाता बल्लीवैशाली मेश्रामवैशाली मद्दीवारसरोज चांदेकरआशु फुलझेलेकविता निखारेअल्का मेश्राम, गौरव जोरगेवार,  दिनेश इंगळेनितेश गवळी आदींची उपस्थिती होती.

     भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त संध्याकाळी शहरातील विविध भागातुन रॅल्या काढण्यात आल्यात. या रॅलींचे स्वागत करण्यासाठी गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत मंच उभारण्यात आले होते. सदर रॅली स्वागत मंच जवळ पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने रॅलीचे स्वागत करण्यात आले. यावेळी रॅलीत सहभागी भिमसैनिकांसाठी शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.