चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

विद्वेषाची सत्ता उलथून फेकण्यासाठी वज्रमुठ सभेला उपस्थित रहा :- खासदार बाळू धानोरकर*

चंद्रपूर : माणसाला  माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून बोलतांना खासदार बाळूभाऊ धानोरकर  बोलतांना म्हणाले की भांडवलशाही सरकारच्या हातात देशात बेबंदशाही आणि जुलूमशाही सत्ता सुरु असून ती उलथवून फेकण्याची महाविकास आघाडीच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथील दर्शन कॉलोनी मैदान केडीके कॉलेज समोर,नंदनवन नागपूर येथे रविवार दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता अति विराट जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ईडी सीबीआय च्या माध्यमातून विरोधकांना कमजोर करणाऱ्या थापा सरकारची लक्तरे वेशीवर काढली जाणार असून वज्रमुठ सभेतून लोकशाही संविधान आणि देशाची एकता आणि अखंडता या साठी महाविकास आघाडीच्या पाठीमागे वज्रमुठी प्रमाणे एकसंघ राहण्याचे आवाहन करण्यासाठी वज्रमुठ सभा आयोजित केली असल्याचे खासदार बाळु धानोरकर यांनी सांगितले.
देशात कट्टरतावादी सरकारची उतरती कळा सुरू झाल्याने जाती जातीत,धर्मा धर्मात भांडणे लावण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सावधानता बाळगून अश्या सरकारला धडा शिकविण्यासाठी वज्रमुठ सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.