चंद्रपूर (का.प्र ):वाळू तस्करांकङून पैशाची देवाण घेवाण करणा-या महिलेविरुद्ध घुग्घुस पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात झामरे ब्रदर्स नावाच्या गाडीचाही उल्लेख पोलीस तक्रारीत होता. या गाडीचा मालक आरोपी विक्रांत उर्फ विक्की परमेश्वर झामरे (39) रा.संतोषीमाता वार्ड बल्लारशाह यास शुक्रवार(10 जुलै )ला मध्यरात्री घुग्घुस पोलीसांनी अटक केली आहे तर इतर आरोपी फरार आहेत. पैश्याची देवान-घेवान करनारे रेती तस्कर मात्र मोकाटच आहे आता पर्यंत महसुल प्रशासनाने कोणतीच कारवाही केली नाही वढा येथील हजारों ब्रास रेती साठा गजानन वरारकर यांच्या शेतात जमा केलेला जप्त केला नाही व कोणतीच कारवाही केली नाही त्यामुळे महसुल प्रशासनाच्या कार्यप्रणाली वर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.गेल्या 19 जून शुक्रवारला घुग्घुस येथुन जवळच असलेल्या वढा येथे ऊत्खनन अधिकारी असल्याची सांगुन वाळू तस्करांकङून पैशाची देवाण घेवाण करणा-या तोतया महिला व तिच्या साथीदारांचा व्हीडीओ वायरल झाला. घुग्घुस परिसरातील रेती तस्करांनी आपला मोर्चा वढा नदीच्या रेती घाटांवर वळविला आहे.घुग्घुस येथुन जवळच असलेल्या वढा गावाच्या वाळू घाटांवरुन अवैध रेती तस्करी ट्रॅक्टर ट्राली द्वारे सुरु होती.हिच संधी साधुन प्रिया झांबरे महिलेने स्काॅर्पीओ क्रमांक एमएच 34 बीएफ 4449 मध्ये तिन इसमांना सोबत घेऊन वढा गावात दाखल होऊन त्यांनी गावचे पोलीस पाटील किसन वरारकर यांना भ्रमणध्वनी वरुन संपर्क साधला व आम्ही उत्खनन विभागातुन आलो आहे, असे सांगितले. पोलीस पाटील येताच त्याच्या सोबत वाळू घाटांवर जाऊन एक ट्रॅक्टर पकडले व त्यालाही तेच सांगुन ट्रॅक्टर लावण्याची धमकी दिली. त्या ट्रॅक्टर धारकाकडुन हजारों रुपयाची मोठी रक्कम वसुल करुन तथाकथितांनी पोबारा केला.“भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक अल्का खेडकर यांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी जिल्हा अधिकारी चंद्रपुर व जिल्हा उत्खनन अधिकारी यांना माहिती दिली. त्यांचे आदेश मिळताच तथाकथित एका महिलेची व तिच्या तिन सहकारी विरुद्ध पोलीसांत तक्रार दिली.”यात पैश्याची देवाण घेवाण करनारे वाळू तस्कर व तोतया उत्खनन अधिकारी महिला व तिचे सहकारी अडकण्याची दाट शक्यता आहे.वाळू तस्करांवर ही गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे दरम्यान घुग्घुस परिसरातील वाळू तस्करीमुळे सर्वसामान्यांचा प्रशासनावर रोष प्रचंड तिव्र झाला आहे.
Related Articles
१ मे रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीने पाळला ” काळा दिवस – विश्वासघात दिवस “
* ” महाराष्ट्र मिटाओ विदर्भ मिलाओ ” आंदोलनात चंद्रपूर येथे कार्यकर्ते ताब्यात * ६ तालुक्यात विदर्भाचे स्टिकर लावले सरकारी कार्यालयांवर चंद्रपूर, – विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिनांक १ मे २०२२ हा महाराष्ट्राने विदर्भातील जनतेचा विश्वासघात केला म्हणुन काळा दिवस पाळण्याचे आंदोलन घोषीत केल्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील सहा तालुक्यात कार्यकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे अशा जोरदार […]
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केली शेतकऱ्याला आर्थिक मदत
शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हक्काची बँक म्हणुन ओडखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ऐन शेतीच्या हंगामात वाघाने हल्ला करून बैल मारल्याने नुकसान झालेल्या तालुक्यातील कांतापेठ येथील शेतकरी राजु वाढई यांना तातडीचे आर्थिक सहकार्य करण्यात आले. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी कांतापेठ येथील नुकसानग्रस्त शेतकरी राजु वाढई यांचे घरी जावुन बँकेच्या वतीने आर्थिक मदतीचा […]
मधुमेह निर्मूलनासाठी “माधवबाग” चे योगदान सर्वोत्कृष्ट – सुधीर मुनगंटीवार यांचे गौरवोद्गार
चंद्रपूर : मधुमेह हा आजार अतिशय मनस्ताप देणारा आहे. माधवबागच्या माध्यमातून मधुमेह निर्मूलनासाठी सुरू असलेले कार्य व संस्थेचे योगदान सर्वोत्कृष्ट आहे असे गौरवोद्गार राज्याचे वन, सांस्कृतिक तथा मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. येथील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात, मधुमेह विजयोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर बाबासाहेब वासाडे, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे, सुधीर आकोजवार, मधुमेह निर्मूलनाचे […]



