चंद्रपुर जिल्हा

वर्धा नदीवरील धानोरा पुलाचे काम प्रतिपथावर

 घुग्घुस (प्रति)घुग्घुस येथून जवळ असलेल्या गडचांदूर रस्त्यावरील वर्धा नदीच्या धानोरा पुलावर अनेक ठिकाणी सळाखी निघाल्या होत्या या पुलावरून जाणाèयांना तारेवरची कसरत करावी लागत होती या रस्त्यावरून दिवस -रात्र गडचांदूर, कोरपना, घुग्घुस यवतमाळ ते मुबंई पर्यंत छोटी मोठी वाहने जातात या पुलावरील सळाखी बाहेर निघाल्यामुळे छोट्या -मोठ्या अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली होती तसेच वाहने पंचर होत होती यामुळे पुलाचे बियेरींग रिपेरींग व काँक्रीट करण्या बाबतचे निवेदन ईबादुल हसन सिद्धीकी यांनी पिडब्लूडीला दिले असता या निवेदनाची दखल घेऊन उपविभागीय अभियंता उदय भोयर व सहाय्यक अभियंता अनिल गिरणारे यांनी दौरा करून वर्धा नदीच्या पुलाचे निरीक्षण केले आणि बेयरिंग रिपेरिंग व मॅक्रो कॉंक्रेटिग करण्याचा अहवाल तयार करून कार्यकारी अभियंता एस. आर. जाधव, अधीक्षक अभियंता सुषमा साकारवडे यांचे कडे सादर केला व त्यांनी पुलाची पाहणी करून मंजुरी दिली व टेंडर काढून एम.बी. घारपुरे यांना तीन करोड दहा लाख सत्याहत्तर हजार नऊशे सदतीस रुपयास मिळाला असून या वर्धा नदीच्या धानोरा पुलाचे काम उपकार्यकारी अभियंता एन.एस.खांडरे व अनिल गिरणारे यांच्या देखरेखीत रिपेरिंगचे काम सुरु आहे

Leave a Reply

Your email address will not be published.