
कोरपना (ता.प्र.)एप्रिल महिना संपत आला असून बळीराजाच्या कामालाही वेग आलेला दिसत आहे. अश्यातच कोरपणा तालुक्यातील अंतरगाव बु येथील हेमराज कांबळे यांच्या शेतामध्ये सुरेश मडावी हे काम करत असताना अचानक रानडुक्कराने त्यांच्यावर हल्ला केला रानडुक्कराच्या हल्यामध्ये सुरेश मडावी हे गंभीर जखमी झाले.बाजूच्या शेतामध्ये काम करत असणाèया शेतकèयांचा ही घटना लक्ष्यात येताच त्यानी घटनास्थळी धाव घेतली.घटनास्थळी शेतकरी एकत्र येताच रानडुक्कराने घटनास्थळावरुन पळ काढला.सुरेश मडावी हे गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांचावर चंद्रपूर येथील जिल्हा सामन्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपचार सुरू आहे.या घटने नंतर अंतरगाव बु शेत शिवारातील शेतकèयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.तेव्हा वनसडी येथे वनअधिकारी मुख्यालयी राहत नाही, तक्रार देतो म्हटले तर अधिकारी चद्रपूर ते कोरपना येथून जाने-येणे करते. शासनाने मुख्यालयी राहण्यास क्वॉटर आहे ते रिकामे धुळ खात आहे म्हणून लोकांचे काम होत नाही. फूकट वेळ वाया जाते. करिता तेव्हा वरिष्ट अधिकारी याकडे लक्ष देतील का?


