चंद्रपुर

मिशन बिगिन अगेन अंतर्गत निर्बंध शिथील करण्याबाबत मार्गदर्शक सूचना

चित्रपटगृहे, योगा केंद्रे, आंतर मैदानी खेळ जलतरण तलाव, सुरु करण्यास परवानगी
चंद्रपूर, दि. 7 नोव्हेंबर : मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्याचे मुख्य सचिव यांच्या अधिसुचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यात 5 नोव्हेंबर पासून निर्बंध शिथील करणे व टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठविणे अंतर्गत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.सुधारित सूचनांनुसार प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील फक्त राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना सरावाकरीता स्विमिंग पुल्स सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे. तसेच योग वर्ग, सर्व इनडोअर खेळाअंतर्गत बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इनडोअर शुटींग रेन्जेंस इत्यादी खेळास सामाजिक अंतर राखून मुभा देण्यात येत आहे. यासाठी क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देश लागू असतील.
सिनेमाघर, मल्टीप्लेक्स, नाट्यगृह सुरू करण्यास एकूण क्षमतेच्या 50 टक्के बैठक व्यवस्थेच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. परंतु या सर्व ठीकाणी कोणत्याही खाण्यायोग्य वस्तुंना विकण्याची किंवा घेवून जाण्याची परवानग