चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार आणि हत्या विरोधात आम आदमी पार्टीची चंद्रपूरात निदर्शने

मणिपूर मधील परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे, मणिपूरमध्ये कुकी समाजातील दोन महिलांची नग्न अवस्थेत दिंड काढून त्यांची हत्या करण्यात आली आहे, हा संघर्ष मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू आहे जवळपास तीन महिन्याचा कालावधी झाला असूनही केंद्र भाजपा सरकार तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळू शकला नाही आहे, आत्तापर्यंत 140 लोकांनी आपला जीव गमावला आहे. मणिपुर मधील दोन महिलांवरील अत्याचाराची घटना खूप संवेदनशील आणि विचलित करणारी आहे, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महिला बालकल्याण मंत्री स्मृती ईराणी यांनी अजूनही मणिपूर बाबत आपल्या तोंडातून एकही शब्द काढलेला नाही, पंतप्रधान सर्व जग फिरता आहेत परंतु मणिपूरला गेले नाहीत हा असंवेदनशीलपणा पंतप्रधानाला शोभत नाही, मणिपूरचे मुख्यमंत्री यांनी अजूनही कुठलीही ठोस कार्यवाही केलेली नाही त्यामुळे तेथील जनता घाबरलेली आहे, भाजपाने देशात डर का मोहोल असे वातावरण तयार केले आहे, आज देश्यात भाजपाचे नेते मंत्री सोडून कुणीही सुखी नाहीं, अशा सरकारला पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. मणिपूरच्या हिंसाचारा संदर्भात आम आदमी पार्टीने राज्यात सर्व जिल्ह्यात त्रिव निदर्शने केली आहेत, केंद्र भाजपा सरकारने लवकरच मनिपुरची परिस्थीती नियंत्रणात आणावी आणि तेथील जनतेला भयापासून मुक्तता द्यावी तसेच महिलांवरील अत्याचारांची तात्काळ चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवून दोषींना कडक शिक्षा करावी अशी मागणी आम् आदमी पार्टीने केली आहे.
या निदर्शने आंदोलनात यावेळेस आपचे जिल्हा अध्यक्ष सुनील देवराव मुसळे, युवा जिल्हा अध्यक्ष मयूर राईकवार, शहर अध्यक्ष योगेश गोखरे, युवा शहर अध्यक्ष संतोष बोपचे, शहर सचिव राजू कुडे, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष दोरखंडे, संघटनमंत्री रहेमान खान पठाण, शहर उपाध्यक्ष सुनील सदभय्याजी, सिकंदर सागोरे, शहर सह सचिव सुधीर पाटील, कोषाध्यक्ष स्वप्निल घागरगुंडे, बाबुपेठ प्रभाग अध्यक्ष अनुप तेलतुंबडे, अश्रफ सय्यद, प्रशांत रामटेके, दीपक बेरशेट्टीवार नामदेव हनवंते, भिमराव मेंढे, सुजित चेडगुलवार, मधुकरजी साखरकर, इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.