चंद्रपुर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरात एक धक्कादायक घटना घडली असून बँकेचा निधी जमा करणाऱ्या आर डी एजन्ट वर पाळत ठेवून असलेल्या 2 व्यक्तींनी दुचाकीने येत आर डी एजन्ट च्या डोळ्यांत मिर्ची पावडर टाकत त्यांच्या जवळील 1 लाख 63 हजार रुपयाची लुट केल्याची घटना 25 एप्रिल ला सकाळी 10:00 च्या दरम्यान घडल्याची माहिती विश्वसनीय सूत्राच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे या संदर्भातील अधिक माहितीनुसार ब्रम्हपूरी शहरातील श्री संजय देवाजी कुळसंगे हें सेंट्रल बँक व आयसिआयसिआय बँकेचे एजन्ट असुन शहरातील लहान-मोठ्या व्यावसायिका कडुन रक्क्म जमा करत असतांना शहरातील एका पेट्रोल पम्प जवळ 2 अज्ञात व्यक्ती दुचाकीं वरून आलेत व त्यानी कुळसंगे यांच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकत त्यांच्या जवळ असलेले 1 लाख 63 हजार रु रक्कम घेऊन पसार झाले या बाबत कुळसंगे यांनी ब्रम्हपूरी पोलिसात तक्रार दाखल केली असुन पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.
Related Articles
विकासनिधीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करणार : माजी आ. अँड. संजय धोटे
राजुरा :– केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे सरकार स्थापन झाले तेव्हा राज्यात शेवटच्या घटकापर्यंत सरकारच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचत आहे,सरकारच्या माध्यमातून अनेक लोक उपयोगी योजनेच्या माध्यमातून सर्व समाजच्या घटकाचा नागरिकांना लाभ मिळत आहे त्यांचं अनुषंगाने राजुरा तालुक्यातील साखरवाही येथे शासनाच्या माध्यमातून सिमेंट रस्त्याच्या बांधकाम करण्याकरिता जनसुविधा निधी अंतर्गत 10 लक्ष रुपयांचे […]
जिल्हयात २४ तासात एकूण ९४ बाधित
चंद्रपुरात कोरोनाने १५ मृत्यू आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १४४८ चंद्रपूर (का.प्र ): कोरोना वर सर्व पातळीवर आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्नांची पराकाष्टा सुरु असतांनाच आज २४ तासात ९४ कोरोना बाधित सापडले आहेत. आतापर्यंत एकूण १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये १३ जिल्ह्याचे तर एक तेलंगणा व एक बुलढाणा जिल्ह्याचा आहे. सध्यास्थितीत एकूण बाधित १४४८ आहेत. तर आतापर्यंत […]
जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांची धाड.
वरोरा वरोरा भद्रावती क्षेत्रात जेव्हापासून उपविभागीय पोलीस अधिकारी नोपानी हे रुजू झाले तेव्हापासून अवैध व्यावसायिकांवर एक प्रकारचा वचक बसला असून प्रस्थापित राजकीय दरारा असलेल्यांना सुद्धा त्यांनी जेरबंद केल्याच्या घटना बघता असा पोलीस अधिकारी सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देतो असा किमान वरोरा वाशीयांना विश्वास आहे, अशातच पोळ्याचा पाडवा साजरा करण्यासाठी तालुक्यातील पिंपळगाव (फत्तेपूर ) जुगार अड्डा […]



