चंद्रपुर

बेपत्ता इसमाचा लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

चंद्रपूर (का.प्र ):चंद्रपूर शहरालगत असलेल्या माना ओपन कास्ट कोळसा खाणी ला लागून असलेल्या जंगल परिसरात लालपेठ येथील जुन्या वस्तीत असणाऱ्या एका इसमाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज काही नागरिकांना जंगल परिसरात इसमाचे शव झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.देविदास गोविंदराव बावसकर असे मृत इसमाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार देविदास बावसकर हा इसम घरून बेपत्ता होता. याची तक्रार शहर पोलिसात दाखल होती. त्यानंतर आज माना ओपन कास्ट कोळसा खाणी ला लागून असलेल्या जंगल परिसरात त्याचे शव झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व शव विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास पीएसआय ठाकरे, मोरेश्वर आलम, विलास निकोडे प्रमोद डोंगरे आदि करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.