
चंद्रपुर :- वरोरा भद्रावती या दोन तालुक्यात राजस्थान व मध्यप्रदेश या प्रांतातून काही व्यापारी हे ट्रॅक्टर सह (हडम्बे) सोयाबीन चणा काढणी यंत्र दरवर्षी आणतात व त्यांचा मुक्काम हा गावागावात असतो, दरम्यान त्यांच्या माध्यमातून गावातील मुली व महिलांची छेड काढणे, त्यांना पळवणे व त्यांची राजस्थान मधे विक्री करणे, स्थानिक ठिकाणी श्रीमंत शेतकऱ्यांच्या घरी चोऱ्या करणे इत्यादी प्रकार होतं असल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या परप्रांतीय ट्रॅक्टर्स मालक व त्यावर काम करणाऱ्या कामगारांचे पोलीस सत्यापन करून त्यांच्या वाहनांची तपासणी करा व त्यांच्या बेकायदेशीर कामामुळे त्यांच्यावर प्रतिबंध लावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे नेते रमेश राजूरकर यांच्या नेत्रुत्वात उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून प्रशासनाला दिला आहे. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के व वरोरा तालुक्यातील स्थानिक मराठी ट्रॅक्टर्स धारक उपस्थित होते. स्थानिक वरोरा, भद्रावती या तालुक्यात जवळपास 300 पेक्षा जास्त युवा शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर्स व त्यासोबत हडम्बे (पीक काढणी यंत्र) कर्ज काढून घेतले Harvesting machine आहे पण राजस्थान व मध्यप्रदेश प्रांतातून येणाऱ्या ट्रॅक्टर्स मुळे त्यांना ऐन पीक काढण्याच्या मोसमात कमी काम मिळते पर्यायाने ते बैंकेचे कर्ज भरू शकत नाही. अगोदरच कर्जात बुडालेला शेतकरी मग हवालदिल होऊन आत्महत्या सारखा पर्याय निवडतो, त्यामुळे स्थानिक बेरोजगार शेतकरी युवकांचा हक्काचा रोजगार परप्रांतातून येणाऱ्या ट्रॅक्टर्स व हडम्बे धारक हिसकावून घेत असल्याने त्यांच्यावर प्रतिबंध लावणे गरजेचे झाले आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.




