
15 व 16 ऑक्टोबर 2022 ला चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर 66 वा धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. या समारंभाला जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील आणि भारतातील अनेक अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. या निमित्त सुविधांची पाहणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी दीक्षाभूमी स्थळाची पाहणी केली.
चंद्रपूर शहरांमध्ये दीक्षाभूमी मैदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथे दि. 15 व 16 ऑक्टोबर 2022 रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यास जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. यादरम्यान वाहतूक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यादृष्टीने चंद्रपूर शहरातून दीक्षाभूमी परीसराकडे जाणाऱ्या रहदारीचा मार्ग दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजतापासून दि. 17 ऑक्टोबर रोजीचे सकाळी 8 वाजेपर्यंतच्या सर्व प्रकारच्या वाहनांची रहदारी वळविणे तसेच जड वाहनांस प्रवेश बंदी करण्यात येत आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी पाहणी केली.



