चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

निलजई खुल्या खाणीतील सीएचपी बंकर ला अचानक लागली आग

 

लाखो रुपयांचा कोळसा जळून खाक

चंद्रपूर – वेकोली वणी परिसरातील निलजई खुल्या खाणीतील सीएचपी बंकर क्रमांक 49 मध्ये शनिवारी दुपारी अचानक आग लागली असून यामध्ये लाखो रुपयांचा कोळसा जळून खाक झाल्याची चर्चा सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेकोली वणी परिसरातील निलजई कोळसा खाणीतून दररोज हजारो टन कोळसा उत्पादित केला जातो.शनिवारी या खाणीतील सीएचपी बंकरला आग लागल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. या बंकरमधून दररोज हजारो टन कोळशाचे गाळप करून परिसरातील विविध उद्योगांना पुरवठा केला जातो. या आगीत कोळशाबरोबरच लाखो रुपयांचे यंत्रही जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. उन्हाळा सुरू होताच कोळशाच्या आगीच्या घटना घडू लागतात. कडाक्याच्या उन्हात अशा घटना वारंवार समोर येतात. वेकोलीच्या माजरी, बल्लारपूर येथील कोळसा खाणीत यापूर्वीही अशाच प्रकारच्या आगीच्या घटना घडल्या आहेत. माजरी भूमिगत, एकोना कोळसा खाण, सास्ती, भटाडी, लालपेठ ओपन कास्टमध्येही अशा आगीच्या घटना घडल्या आहेत. एकोना कोळसा खाणीत 30-40 हजार टन कोळसा जळून राख झाला होता.  सध्या कोळसा पेटू शकेल इतकी उष्णता नाही. या आगीच्या घटनेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. वेकोली वणी परिसरातील कोळसा खाणीतील कोळशाच्या हेराफेरीच्या घटनाही वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्या होत्या.दरम्यान, अनेक अधिकाऱ्यांवर कारवाईही झाली. या आगीच्या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.