वरोरा : भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी राजा शेतात राबतो त्यामुळेच देशातील प्रत्येकाला चांगले अन्न उपलब्ध होते. ही शेती करत असताना शेतकऱ्यांना पशुधनाची फार मोठी मदत होत असते. पशुधन जर सुदृढ राहिले तर चांगले अन्न, शेतीसाठी खत, दूध आणि पदार्थ मिळतील. त्यामुळे पशुधनाची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले.
जिल्हा परिषद चंद्रपूर आणि पंचायत समिती वरोराच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाला वरोरा भद्रावती विधानसभेच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांची उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते प्रदर्शनीचे उद्घाटन करून उत्कृष्ट ठरलेल्या पशु मालकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला राजेंद्र चिकटे माजी सभापती कृ. उ. बा. स. वरोरा, जिल्हा परिषद संवर्धन उपायुक्त डॉ. मंगेश काळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरूरकर, लघु पशुसंवर्धन चिकित्सक वरोराचे सहाय्यक आयुक्त डॉ. दिलीप देशमुख, बोर्डा ग्रामपंचायतच्या सरपंच ऐश्वर्या खामनकर, उपसरपंच राहुल ठेंगणे, आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. मुकुंद पातोड, वरोरा पंचायत समितीचे विकास अधिकारी डॉक्टर वसंत जांभूळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संजय घागी यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गटविकास अधिकारी संदीप गोडसेलवार, पशु विकास अधिकारी डॉ. सतीश अडकले, खेमजईचे पशुविकास अधिकारी डॉक्टर सतीश अघडते, माढेली येथील पशू विकास अधिकारी डॉक्टर माधवी गोंगले, वरोरा येथील पशु विकास अधिकारी डॉक्टर राहुल शेंद्रे यांनी सहकार्य केले.