चंद्रपुर

दहावीचा भूगोलाचा पेपर न घेता सरासरी गुण देण्यात यावे -आ.सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर (का.प्र.)कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउन मुळे इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा जो पेपर राहिला आहे , तो न घेता विद्याथ्र्यांना सरासरी गुण देण्यात यावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड़ यांच्याकड़े केली आहे. सदर प्रकरणी येत्या ४ दिवसात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.

दहावीचा भुगोलाचा पेपर दि. २१ मार्च २०२० रोजी घेण्यातदिले. येणार होता, मात्र कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा पेपर रद्द करण्यात आला. आता तर लॉकडाउनमुळे व कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे हा पेपर सध्या घेणे शक्य सुद्धा नाही. विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये या दृष्टिकोनातून हा पेपर रद्द करून सरासरी गुण देण्यात यावे अशी भूमिका आ . मुनगंटीवार यांनी प्रा. वर्षा गायकवाड़ यांच्याशी दूरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेदरम्यान केली. या मागणीच्या अनुषंगाने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रा. वर्षा गायकवाड यांनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *