चंद्रपूर दि.25 नोव्हेंबर : जिवती, कोरपना व गोंडपिपरी येथील नगरपंचायतीचे आरक्षण सोडत दि. 27 नोव्हेंबर 2020 रोजी निश्चित करण्यात येणार आहे. यासंबंधाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता दिली असून प्रभागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करावयाचे आहे.जिवती नगरपंचायतीसाठी उपविभागीय अधिकारी रोहन घुघे, कोरपना नगरपंचायती साठी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) जनार्धन लोंढे, तर गोंडपिपरी नगरपंचायतीसाठी उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) प्रियंका पवार-कर्डीले यांचे अध्यक्षतेखाली संबंधीत नगरपंचायत कार्यालयात दिनांक 27 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 12 वाजता सोडत पद्धतीने जागा निश्चित करण्यात येतील.तरी आरक्षण सोडतीच्या वेळी संबंधित नगरपंचायत क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
Related Articles
आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या पायदळ वारीचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत
देवशयनी आषाढी एकादशी निमित्त बाबूपेठ माऊली परिवार तर्फे काढण्यात आलेल्या पायदळ वारीचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जैन भवन जवळील कार्यालयासमोर स्वागत करण्यात आले. देवशयनी आषाढी एकादशी निमित्त बाबुपेठ माऊली परिवारच्या वतीने बाबुपेठ येथील गुरुदेव चौक येथून पायदळ वारी काढण्यात आली. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जैन भवन जवळील कार्यालया समोर या वारिच्या स्वागताची तयारी करण्यात आली […]
आजचे कोरोना अपडेट
जिल्ह्यात 297 कोरोनामुक्त, 122 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यू चंद्रपूर,दि.9 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 297 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 122 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 2 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. बाधित आलेल्या 122 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 28, चंद्रपूर तालुका 7, बल्लारपूर 21, भद्रावती […]
मुल चंद्रपूर मार्गावर केसलाघाट जवळ बस-ट्रकची समोरासमोर धडक अनेक जखमी
मूल वरुन चंद्रपूर कडे जाणाऱ्या बस आणि चंद्रपूर वरून मूल कडे येणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाल्याची घटना मूल-चंद्रपूर मार्गावर (ता. 4 जुर्ले) रोजी 5 वाजता दरम्यान घडली परिवहन महामंडळाची बस क्रं. एम एच 40 एक्यु 744 ही मूल बस स्थानकावरुन चंद्रपूरकडे जात होती तर चंद्रपूर वरून ट्रक क्रं. सी जी […]



