चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या पायदळ वारीचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त बाबूपेठ माऊली परिवार तर्फे काढण्यात आलेल्या पायदळ वारीचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जैन भवन जवळील कार्यालयासमोर स्वागत करण्यात आले.  देवशयनी आषाढी एकादशी निमित्त बाबुपेठ माऊली परिवारच्या वतीने बाबुपेठ येथील गुरुदेव चौक येथून पायदळ वारी काढण्यात आली. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जैन भवन जवळील कार्यालया समोर या वारिच्या स्वागताची तयारी करण्यात आली होती. सदर वारी गांधी चौक  होत यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालया समोर पोहोचताच वारीचे स्वागत करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांनी विठ्ठल रुखमाई च्या मुर्तीला माल्यार्पण करुन नमन केले. यावेळी वारीत सहभागी वारक-यांसाठी अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकरबंगाली समाज शहर संघटिका सविता दंडारेयुवती प्रमुख भाग्यश्री हांडेरुपा परसरामपौर्णिमा बावणेवैशाली मद्दीवारवंदना हजारेसरोज चांदेकरचंदा वैरागडेश्याम राजूरकर आदीची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.