चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

मुल चंद्रपूर मार्गावर केसलाघाट जवळ बस-ट्रकची समोरासमोर धडक अनेक जखमी

मूल वरुन चंद्रपूर कडे जाणाऱ्या बस आणि चंद्रपूर वरून मूल कडे येणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाल्याची घटना मूल-चंद्रपूर मार्गावर (ता. 4 जुर्ले) रोजी 5 वाजता दरम्यान घडली परिवहन महामंडळाची बस क्रं. एम एच 40 एक्यु 744 ही मूल बस स्थानकावरुन चंद्रपूरकडे जात होती तर चंद्रपूर वरून ट्रक क्रं. सी जी 04 आय एफ 6255 मूलकडे येत होता, दरम्यान बस आणि ट्रक मध्ये झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार बस चालकाचे दोन्हीही पायाला गंभीर जखम झाली असून, रुग्णवाहिकेने तातडीने त्यांना चंद्रपूरला हलविले आहे. अन्य प्रवाशांना किरकोळ जखमा झाले आहे. बस चालकांनी विरुद्ध दिशेने जाऊन ट्रकला ठोस मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले”

घटनास्थळावर मूल पोलीस पोहचुन जखमीना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात हलविले, पुढील तपास मूल पोलीस करीत आहे गडचिरोली मूल चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गावर दररोज दोन ते तीन अपघात होत असल्याने प्रशासनाने याची वेळीच दखल घेणे आवश्यक असल्याचे मत आता व्यक्त केले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published.